Note- Website www.durgacafe.com is not at all official though shown official as the same is illegal

Times Hospitality Iconic Coffee Award

Shows Sponsored

दैवीशक्ती हि दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी , सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, कालिका, एकविरा, वज्रेश्वरी, हरबसणी, जीवदानी इ. विविध नावांनी उपासली जाते. भारतात अनेक शक्तिस्थाने आहेत. यातील कित्येक अज्ञात असून काही ठिकाणी तर या देवता मूर्ती स्वरूपात आढळतातच, असेही नाही. तरीही हि स्थाने भक्तिभावाने पुजली जातात.

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून #नवरात्र उत्सव म्हटला जातो. या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आकाशवाणी पुणे केंद्र सादर करत आहे विशेष कार्यक्रम #नवशक्ती_दर्शन

या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना घरबसल्या कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, चित्रकूट-जम्मूची वैष्णोदेवी, ढाका-बांग्लादेशाची ढाकेश्वरी, कोलकत्ता-बंगालची दुर्गामाता, गुवाहाटी-आसामची कामाक्षी, मदुराई-तामिळनाडूची मिनाक्षी, मैसूर-कर्नाटकची चामुंडा, बांसवाडा-गुजरातची आंबा माता यांचं एकप्रकारे दर्शनच घेता येणार आहे.

निवेदन – किरण डहाळे

सादरकर्ते – प्रदीप हलसगीकर

प्रसारण – १७ ते २५ ऑक्टोबर २०२०, सकाळी ९:१0आणि सायंकाळी ६:१0 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या विविध केंद्रावरून

लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

Android App – https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

IoS App – https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

तसेच प्रसारभारतीच्या संकेतस्थळावरही आपण लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकू शकता. (http://prasarbharati.gov.in/)

#Navratri #NavashaktiDarshan

In the News

Interview

Our Sponsored Shows

Love from Customers